Voter ID Name changing: मतदार पत्रातील नाव कसे बदलायचे?

तुमच्या हि मतदार पत्रामध्ये काही अडचण येते आहे ? का तुम्हलाही मतदार पत्रामध्ये काही बदल करायचे आहे का ?असं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

मतदार ओळखपत्र भारतीय नागरिकांना निवडणुकीत मतदान करण्याची पात्रता देते. ते ओळखपत्र म्हणून काम करते. मतदान करण्यासाठी, व्यक्तींनी कार्डवरील सर्व तपशील अचूक आणि अद्ययावत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. अनेकदा तुमच्या ओळखपत्रात (Voter ID) नावात चूक असते, ती चूक एखाद्या महत्वाच्या कामात समोर येते आणि तुमचे काम रोखावले जातात . अशा वेळी तुम्ही लगेच ओळख पत्रातील कोणत्याही प्रकारची चूक तात्काळ दुरुस्त करणे गरजेचं आहे.

यासाठी लागणार फॉर्म कोणता ?

मतदार ओळखपत्र मध्ये काही दुरुस्ती करण्या साठी फॉर्म 8 वापरला जातो .हा फॉर्म तुम्हला मतदार यादीतील विशिष्ट तपशील मध्ये बदल करण्याची परवानगी देतो.तुम्हाला हा फॉर्म https://voters.eci.gov.in/ करण्यासाठी जावे लागेल. या सरकारी साईटवरून तुम्ही फॉर्म 8 सहज मिळवू शकता.

मतदार पत्रातील नाव कसे बदलायचे ?

  • अधिकृत राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर लॉग इन करा .
  • मुख्य पानावर ‘मतदार यादीतील नोंदी दुरुस्त करा’ ह
  • ‘फॉर्म ८’ बटणावर टॅप करा.
  • ‘स्वतः’ हा पर्याय निवडा आणि ‘सबमिट करा’ वर क्लिक करा.
  • पुढे, ‘विद्यमान मतदार यादीतील नोंदी दुरुस्त करा’ हा पर्याय निवडा आणि ‘ओके’ वर क्लिक करा.
  • तुम्ही ज्या ‘राज्य, जिल्हा आणि विधानसभा/संसदीय मतदारसंघाशी संबंधित आहात’ ते आपोआप भरले जाईल.
  • तुमचा आधार क्रमांक, ईमेल आणि मोबाईल नंबर द्या आणि ‘पुढील’ वर क्लिक करा.
  • ज्या तपशीलात सुधारणा किंवा बदल आवश्यक आहेत ते निवडा
  • नाव बदलण्यासाठी आवश्यक असलेले नाव आणि सहाय्यक कागदपत्रे प्रविष्ट करा.
  • सहाय्यक दस्तऐवज अपलोड करा आणि ‘पुढील’ वर क्लिक करा.
  • घोषणापत्र भरा, कॅप्चा कोड एंटर करा आणि ‘सबमिट करा’ वर क्लिक करा.

मतदार पत्रामध्ये नाव बदलण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.

  1. आधार कार्ड
  2. जन्म दाखला
  3. पॅन कार्ड
  4. पाणी/वीज/गॅस जोडणी बिल
  5. बँक/पोस्ट ऑफिस पासबुक
  6. पासपोर्ट
  7. ड्रायव्हिंग लायसन्स
  8. 10 वी किंवा 12 वी प्रमाणपत्र

Leave a Comment