Lumpy Diseases control: राज्यभरात लम्पी आजार दिवसानदिवस वाढताना दिसतोय. लंपी हा साथीचा आजार असल्याने हा अनेक जनावरांना होण्याची शक्यता असते . त्यावर सामुदायिक प्रयत्न गरजेचे आहे या आजाराच्या नियंत्रणेसाठी जनावरांचे अधिक काळजी घेणे महत्त्वाचे असते तर तसेच औषधोपचार हे तत्व प्रभावी ठरते. पौष्टिक खाद्य स्वच्छता जंतुनाशक फवारणी या त्रिसूत्रेने लांबीच्या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य असते.
या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण व जनावरांचे व्यवस्थापन करणे हे महत्त्वाचे मार्ग ठरते. या उपायाच्या मदतीने आजार नक्कीच कमी होऊ शकतो. हा आजार म्हैस, मेंढी ,शेळी इतर प्राण्यांमध्ये आढळत नाही. आजार गोवंश जनावरांमध्ये म्हणजेच वासरू,गाय,बैल यांच्या मधे आढळतो.
- लम्पी आजार कसा ओळखायचा
जनावरांना ताप, सूज, अंगावर गाठी आणि दूध उत्पादनात घट दिसते
- लम्पीचा प्रसार कसा होतो?
डास, माशी, गोचिड आणि संसर्गजन्य वस्तूंमुळे लम्पीचा फैलाव होतो.
- लम्पीवर कोणती लस प्रभावी आहे?
गोवंश जनावरांसाठी प्रतिबंधात्मक लसीकरण प्रभावी ठरते (सरकारी लसी उपलब्ध).
- बाधित जनावरांना काय खाऊ घालावे?
जनावरांना एकत्र न ठेवणे, सार्वजनिक पाणी वापरणे आणि गोठ्यात बाहेरच्यांचा प्रवेश टाळावा.
लम्पी हा आजार कशाच्या माध्यमातून प्रसार होतो :
लम्पी हा साथी चा आजार असून .माश्या ,गोचीड, चिलटे, विषाणू डास यांसारख्या किटाणूच्या माध्यमातून पसरतो. त्याच्यासोबत जनावरांच्या संपर्कातील वस्तू जखमा आणि अशुद्ध पाणी यामुळे आजाराचा प्रसार होतो.
लम्पीचे लक्षणे
जनावरांना 104 ते 105 अंशत ताप येणे पायावर सूज येणे. आणि त्यामुळे जनावर लंगडणे .ताप उतरल्यावर संपूर्ण शरीरावर गाठी दिसणे. मागील पाया जवळील लसिका ग्रंथी सुजणे जनावरांची चाल मंदावणे भूक कमी आणि दूधही कमी होणे.हे सर्व या आजाराची लक्षणे असतात.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
गाय, बैल, वासरे यांच्या लम्पी पासून संरक्षणासाठी वेळेवर लसीकरण करा गोठा रोज साफ करावा. हा आजार संपेपर्यंत नवीन जनावरांची खरेदी करणे टाळा. अति गर्दीच्या ठिकाणी जनावरांना ने आन करणे टाळावे. निर्जनतुकीकरण सोडियम हायपोक्लोराईड पाण्याचा वापर करावा. गोठ्यात बाहेरच्यांना प्रवेश देण्याच्या पहिले काळजी घ्यावी. जे गोठ्यात जाणारे व्यक्ती आहे त्यांनी हात ,कपडे स्वच्छ केले आहेत का नाही याची खात्री करून घ्या. एका गोठ्यात काम करणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्या गोठ्यात जाऊ नये कारण त्यामुळे हा आजार पसरण्याची शक्यता असते.
जनावरांचे व्यवस्थापन:
आजारी जनावरांचे काळजी घेऊन त्यांना ऊन पाऊस वारा यांपासून त्यांचे संरक्षण करा. आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवा. जनावरांना संतुलित आहार हिरव्या चारा सोबत पेंड, खनिज मिश्रण, लिव्हर टॉनिक आणि पाचानासाठी उपयोगी औषध द्यावे. यासोबतच खाद्यपदार्थाचे भांडे स्वच्छ असावे याचीही खात्री घेणे.
जनावरांचे पाय सुजतात त्यासाठी मीठ टाकून गरम पाण्याचा शेक सकाळ संध्याकाळ द्यावा. जनावरांच्या अंगावर गाठी आल्यावर मिठाच्या पाण्याने दिवसातून दोन वेळा अंग पुसा. गाठी रोजच्या रोज स्वच्छ ठेवत जा जनावर खाली बसत नसल्यास त्यांच्या खाली गवत किंवा पोते टाकावे. एकाच ठिकाणी बराच वेळ बसल्याने गाठीवर जखमा होतात त्यामुळे वारंवार जनावरांची जागा बदलावे. त्यासोबतच पशुवैद्यांचे सल्ले घ्यावे
.बाधित जनावरांना त्वचेवर बऱ्याच गाठी आणि जखमा होतात. या जखमांसाठी कापूर आणि खोबरेल तेल एकत्र करुन लावावे. तोंड व कास हे संवेदनशील अवयव असल्याने त्यावरील जखमा पोटॅशिअम परमॅग्नेटने धुऊन बोरोग्लिसरीन लावावे. जनावराचे नाक बंद झाल्यास कोमट पाण्याने पुसा आणि बोरोग्लिसरीन टाका यासोबतच सर्दी असल्यास निलगिरी तेल टाकून पाण्याची वाफ द्या.