Ladki Bahin Karj Yojana 2025: सर्व लाडक्या बहिणी साठी एक आनंदा ची बातमी काल झालेल्या राज्य सरकारच्या बठकी मध्ये लाडक्या बहिणी साठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चक्क लाडक्या बहिणींना 0 टक्के व्याजदर आणि कर्ज मिळणार आहे. याबद्दल सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. याबद्दल माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण योजना हे राज्य सरकारला निवडणुकीसाठी देखील गेम चेंजर ठरलेले आहे. आणखी प्रभावीपणे लाडकी बहीण योजना ही सर्व महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारकडून काम करण्यात येत आहे. याचाच फायदा आता राज्यातील महिलांना होणार असून एक लाख रुपयांपर्यंत 0 टक्के व्याज दराने कर्ज देण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे.
ladki bahin karj yojna :
माझी लाडकी बहीण योजना या योजेनच्या माध्यमा मधून अनेक महिलांना दर महिना 1500 रुपय मिळत आहे .अनेक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असतो पण त्या साठी पैसाचे साधन खूप महत्वाचे असते .त्या साठी सरकरने एक मोठा निर्णय घेतला आहे . महिलांना अधिक सक्षम बनवण्यासाठी या योजनेला मुंबई बँकेच्या मदतीने शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे. मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी नुकती सर्वात मोठी घोषणा केलेली असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज वितरित करण्यात येणार असल्याची माहिती ही प्रवीण दरेकर यांनी नुकतीच जाहीर केलेली आहे. योजना मुंबईतील सर्व महिलांसाठी राबविण्यात येणार असून महिलांना अधिक सक्षम होण्यासाठी तसेच महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे.
लाडक्या बहिणींना 0 टक्के व्याजदर आणि कर्ज मिळणार आहे. याबद्दल सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. याबद्दल माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण योजना हे राज्य सरकारला निवडणुकीसाठी महत्वाचे ठरले आहे . माझी लाडकी बहीण योजना हि योजना सर्व महिलां पर्यंत पोहचावे या साठी राज्य सरकारचे या वर विशेष लक्ष देण्यात येत आहे . याचाच फायदा आता राज्यातील महिलांना होणार असून एक लाख रुपयांपर्यंत 0 टक्के व्याज दराने कर्ज देण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे.
Ladki Bahin Karj Yojana Apply;
टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात माहिती प्रवीण दरेकर यांनी दिलेली असून महिलांना सरकारच्या 4 महामंडळाच्या विविध योजनेच्या माध्यमातून हा व्याजाचा परतावा देखील देण्यात येणार आहे राज्य सरकारच्या चार महामंडळांनी योजना सुरू करण्यासाठी प्रतिसाद दिलेला असून यांच्या माध्यमातून 12% पर्यंत व्याजाचा परतावा हा परत मिळणार आहे. यामध्ये पर्यटन महामंडळाची आई योजना या योजनेच्या माध्यमातून 12 टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा देण्यात येणार आहे.
महिलांना मुंबई बँकेकडून मिळणार 1 लाख रुपये बिनव्याजी कर्ज
- मुबंई बँकेचे अद्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे मुंबई बँकेच्या माध्यमातून 0 टक्के व्याजदर आणि 1 लाख रुपये पर्यंतचा कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे या संबंधी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केलेली होते.
- मुंबई बँकेच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे लाडकी बहिणींना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी अधिक मदत मिळणार आहे. तसेच 0 टक्के व्याजदराने कर्ज मिळणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
- लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी पात्र महिला मुंबईमध्ये एकूण 12 ते 15 लाख दरम्यान आहेत. आणि यातील महिलांना देखील या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.