IBPS RRB Bharti 2025: आयबीपीएस दारा देशातील विविध बँकांच्या आस्थपनेवरील विविध पदां साठी जागा राखीव करण्यात आल्या आहे यासाठी तब्बल 13217 अर्ज भरण्यात येणार आहे. यासाठी पात्रता धारक असण्याऱ्या उमेदवाराकडून ओंलीने पद्धतीने अर्ज भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव आणि तपशील
पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ऑफिस असिस्टंट (Multipurpose) | 7972 |
2 | ऑफिसर स्केल-I (Assistant Manager) | 3907 |
3 | ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) (Manager) | 854 |
4 | ऑफिसर स्केल-II (IT) | 87 |
5 | ऑफिसर स्केल-II (CA) | 69 |
6 | ऑफिसर स्केल-II (Law) | 48 |
7 | ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) | 16 |
8 | ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) | 15 |
9 | ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) | 50 |
10 | ऑफिसर स्केल-III | 199 |
total | 13217 |
शैक्षणि पात्रता
- ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय) पदांकरिता उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा त्याच्या समकक्ष पदवी धारण केलेली असावी.
- ऑफिसर स्केल-१ (सहाय्यक व्यवस्थापक) पदांकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा त्याच्या समकक्ष कृषी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, कृषी विपणन आणि सहकार, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र किंवा लेखा या विषयात पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- ऑफिसर स्केल-II जनरल बँकिंग ऑफिसर (मॅनेजर) पदांकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा त्याच्या समकक्ष अर्हता किमान ५०% गुणांसह धारण केलेली असावी. तसेच बँकिंग, वित्त, विपणन, कृषी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, कृषी विपणन आणि सहकार, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र आणि लेखा या विषयांमध्ये पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- ऑफिसर स्केल-II स्पेशालिस्ट ऑफिसर्स (मॅनेजर) पदांकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन/ संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान या विषयात पदवी किंवा त्याच्या समकक्ष अर्हता किमान ५०% गुणांसह धारण केलेली असावी. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया कडून प्रमाणित असोसिएट मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायदा किंवा त्याच्या समकक्ष किमान ५०% गुणांसह पदवी धारण केलेली असावी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून चार्टर्ड अकाउंटंट किंवा वित्त विषयात एमबीए पूर्ण केलेले असावे किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून मार्केटिंग मध्ये एमबीए पूर्ण केलेले असावे किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी/ फलोत्पादन/ दुग्धव्यवसाय पशुसंवर्धन/ वनीकरण/ पशुवैद्यकीय विज्ञान/ कृषी अभियांत्रिकी/ मांसपालन या विषयात पदवी किंवा त्याच्या समकक्ष अर्हता किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- ऑफिसर स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक) पदांकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा त्याच्या समकक्ष अर्हता किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. तसेच बँकिंग, वित्त, विपणन, कृषी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, कृषी विपणन आणि सहकार, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र आणि लेखा या विषयांमध्ये पदवी/ पदविका असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा
पद | वयोमर्यादा |
ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय) | १८ वर्ष ते २८ वर्ष दरम्यान असावे. |
ऑफिसर स्केल- I (असिस्टंट मॅनेजर) | १८ वर्ष ते ३० वर्ष दरम्यान असावे. |
ऑफिसर स्केल- II (व्यवस्थापक) | २१ वर्ष ते ३२ वर्ष दरम्यान असावे. |
ऑफिसर स्केल- III (वरिष्ठ व्यवस्थापक) | २१ वर्ष ते ४० वर्ष दरम्यान असावे. |
अर्ज शुल्क –
अधिकारी (स्केल I, II आणि III) पदांकरिता एससी/ एसटी/ पीडब्ल्यूबीडी प्रवर्गातील उमेद्वारांसाठी १७५/- रुपये तर इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८५०/- रुपये आहे आणि ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय) पदांकरिता एससी/ एसटी/ पीडब्ल्यूबीडी/ ईएसएम/ डीईएसएम प्रवर्गातील उमेदवारांसाठी १७५/- रुपये तर इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८५०/- रुपये (जीएसटीसह) आहे.