Institute of banking personnel selection Bharti 2025:जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी आतुरतेने वाट पाहत असाल .तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आयबीपीएस क्लर्क भरती (IBPS Clerk Bharti) या भरती अंतर्गत लिपिक पदांच्या जागेसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
IBPS clerk Bharti
आयबीपीएस पदांसाठी मेगा भरती ची जाहिरात काढली आहे. या भरतीमध्ये दहा हजार 277 जागा भरल्या जाणार आहेत. आयबीपीएस म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मोफत लिपिक आणि ग्राहक सेवा सहाय्यक (clerk/customer service Associate) या पदांसाठी ऑनलाइन अर्जास सुरुवात झाली.
IBPS Bharti Educational Qualification 2025:
1.संगणक साक्षरताः संगणक प्रणालीमध्ये कार्य करण्याचे आणि ऑपरेटिंगचे ज्ञान आवश्यक आहे. म्हणजेच उमेदवाराकडे संगणक ऑपरेशन / संगणक भाषा यामधील प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असावी किंवा माध्यमिक शाळा / महाविद्यालय / संस्थेत संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान हे विषय म्हणून शिकलेले असावे.
2.भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा समतुल्य पात्रता असणे आवश्यक आहे.
IBPS clerk Bharti Recruitment:
पात्रता उमेदवार त्यांचा अर्ज कोणत्या वेबसाईटवर भरू शकणार .त्यासाठी किती जागा आहेत .पदांचे नाव, शैक्षणिक पात्रता ,वयोमर्यादा, वेतन, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख आणि अर्ज प्रक्रिया करण्याचे शेवटचे तारीख हे सर्व आपण खाली दिलेल्या तक्ता जाणून घेणार आहोत.
माहितीचा तपशील | विवरण /माहिती |
पदाचे नाव | लिपिक / ग्राहक सेवा असोसिएट्स (CSA) |
शैक्षणिक पात्रता | पदवीधर किंवा समतुल्य पात्रता आणि संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व काम करण्याचे ज्ञान आवश्यक |
वयोमर्यादा | 20 वर्षे ते 28 वर्षे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
रिक्त पदे | 10,277 पदे |
वेतन/मानधन | दरमहा रु. 19,900/- ते रु. 47,920/- |
अर्ज शुल्क | SC/ST/PWBD/ESM/DESM उमेदवारांसाठी रु. 175 रुपये तर सामान्य/OBC आणि इतर सर्व उमेदवारांसाठी 850 रुपये |
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 01 ऑगस्ट 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 ऑगस्ट 2025 |
पूर्व परीक्षा तारीख | ऑक्टोबर 2025 |
पूर्व परीक्षेचा निकाल | ऑक्टोबर / नोव्हेंबर 2025 |
मुख्य परीक्षा तारीख | नोव्हेंबर 2025 |