Aadhar Card Name Changing: तुम्हालाहि आधार कार्ड मध्ये नाव बदलायचे आहे का ? आधार कार्ड आज प्रत्येक एका भारतीय नागरिक कडे आहे. आधार कार्ड नागरिकांना साठी महत्वाचे दस्तऐवज आहे. आधार कार्ड फक्त एक दस्तऐवज नाही तर भारतीय नागरिकांची ओळख आहे.
तर ओळखीचा मानक पुरावा आहे. शासकीय वा खासगी व्यवहारांमध्ये Aadhaar आवश्यक असल्याने नाव योग्य ठेवणे अत्यंत गरजेचे ठरते. लग्नानंतर Surname बदलायचा असेल किंवा नावातील चूक दुरुस्त करायची असेल तर आधार कार्ड मध्ये नाव कसे बदलता येईल हे बघा.
आधार कार्ड मध्ये नाव किती वेळा बदलता येते?
आधार कार्ड मध्ये 2 वेळा नाव बदलण्याची परवानगी असते. त्या मुळे आधार कार्ड साठी अर्ज करण्यापुरवी स्पेलिंग,क्रम, पत्ता नीट तपासून दस्तऐवज ची नीट पाडताळणी करून घ्या.
नाव बदलण्याची प्रक्रिया
- My Aadhaar मध्ये जाऊन Aadhaar नंबर आणि OTP टाकून लॉगिन करा.
- UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- Update Aadhaar हा पर्याय निवडा.
- Name Update हा ऑप्शन निवडा.
- Marriage Certificate इत्यादी आवश्यक कागदपत्रे आणि तपशील अपलोड करा.
- टाकलेली माहिती आणि दस्तऐवज तपासून Submit करा.
- Rs 50 इतके non-refundable शुल्क ऑनलाइन भरा.
आधार कार्ड चे महत्व
भारतीय नागरिकांच्या ओळखीसंदर्भात आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वपूर्ण कागदपत्र आहे.बँक खाते उघडणे, मोबाइल कनेक्शन, शासकीय योजना, KYC आणि इतर अनेक सेवा या Aadhaar वर अवलंबून असतात. 2009 मध्ये आधार कार्ड लॉंच झाले. (UIDAI) ने जरी केलीले हे 12 अंकी स्वतंत्र ओळख आहे. आधार क्रम हा ID पुरावा म्हणून चालतो.
आधारकार्डसाठी अर्ज कसा करायचा?
- आपल्या जवळील नोंदणी केंद्रा मध्ये जा.
- https://aadharcarduid.com/aadhaar-card-apply-online यावरून आॅनलाइन अपॉईंटमेंट नोंदवा.
- ID, पत्ता आणि जन्मतारखेचा पुरावा सादर करा. ID पुरावा म्हणून लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, PAN कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी फोटो ओळखपत्र इत्यादींचा समावेश आहे.
- आवश्यक माहिती लिहून फॉर्म भरा आणि फॉर्म आणि कागदपत्रे सादर करा.
- बायोमेट्रिक्स प्रक्रिया पूर्ण करा.
- नोंदणी पुरावा म्हणून तुम्हाला एक पावती मिळेल. यात 14 अंकी नोंदणी क्रमांक असेल जो आपल्याला आपल्या अर्जाची सद्य स्थिती शोधण्यासाठी मदत करेल.
- एकदा पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली की आपले आधारकार्ड आपल्या निवासी पत्त्यावर पोस्टाने येईल. कृपया हे लक्षात घ्या की आपले आधारकार्ड मिळायला सुमारे तीन महिने लागतील.