Farmer Anudan List 2025 : ज्यामुळे राज्यामधील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 40 हजार रुपयांपर्यंत बोनस देण्यात येणार आहे.महाराष्ट्र मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरला 20 हजार रुपये धानाचा बोनस जाहीर करण्यात आलेला होता. या योजनेसाठी एकूण 1800 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
Farmer Anudan List Maharashtra 2025
बोनस वितरणामध्ये मोठा घोटाळा झाल्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा तपासणी करण्यासाठी काही कालावधी गेलेला होता. राज्यातील आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना हा बोनस देण्यात येणार आहे. त्यामुळे हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खातेवर जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उशीर झालेला पाहायला मिळतो आहे. शेतकऱ्यांकडून देखील खूप मोठ्या प्रमाणात याबद्दल प्रश्न विचारण्यात येत होते. विधानसभेमध्ये देखील यावर खूप वेळा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता. मात्र हा निधी जमा होण्या साठी मोठा कालावधी गेलेला असला तरी देखील हा निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हस्तांतरित करण्यात येत आहे.
Farmer Anudan List 2025 :
उर्वरित जिल्ह्याची रक्कम या जिल्ह्याच्या नंतर जमा करण्यात येणार असल्याची माहिती सध्या वृत्तवाहिन्यावर देण्यात आलेली आहे. 17 ते 18 जून 2025 पासून या निधीचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली असून राज्यातील गोंदिया भंडारा नाशिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रथम टप्प्यात जमा करण्यास सुरुवात झालेली आहे.
दोन हेक्टर साठी 40 हजार रुपये मिळणार; प्रतिहेक्टरी 20 हजार रुपये ?
कारण शेतकऱ्यांना बी बियाणे, खते खरेदी करण्यासाठी तसेच शेतीची इतर कामे करण्यासाठी निधीची आवश्यकता होती. मात्र हा निधी 15 दिवस अगोदर बँक खात्यावर जमा करण्यात आला असता तर याचा प्रत्यक्षपणे फायदा हा शेतकऱ्यांना महत्त्वाच्या कामासाठी झाला असता. सध्या राज्यांमधील खरीप हंगामाची मोठ्या प्रमाणात तयारी झालेली आहे शेतकऱ्यांना असे वाटत होते की, पेरणी अगोदर हे पैसे बँक खात्यावर जमा करण्यात येतील. परंतु असे न झाल्याने शेतकऱ्यांनी देखील याबाबत अनेक वेळा विचारणा केलेली होती. प्रदीर्घ प्रतीक्षा नंतर का होईना हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.आणि आता मिळत असलेल्या निधीमुळे देखील शेतकऱ्यांना निश्चितच मोठा आधार मिळणार आहे