Thane DCC Bank Bharti 2025: ठाणे डीसीसी बँकेत १६५ जागांसाठी मेगाभरती! 

 ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक, शिपाई, सुरक्षा रक्षक आणि वाहनचालक पदांच्या १६५ जागांसाठी भरती सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ ऑगस्ट २०२५ असून, निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होईल. कनिष्ठ लिपिकांसाठी ९४४ रुपये, तर इतर पदांसाठी ५९० रुपये शुल्क आहे.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांच्या १६५ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये कनिष्ठ लिपिक, शिपाई, सुरक्षा रक्षक आणि वाहनचालक पदांचा समावेश आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ ऑगस्ट २०२५ असून, ऑनलाइन परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १६५ रिक्त जागा भरण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइट्स www.thanedistrictbank.com किंवा www.thanedccbank.com वर ऑनलाइन अर्ज करता येतील. कनिष्ठ लिपिक पदाच्या १२३ जागा, शिपाई पदाच्या ३६ जागा, सुरक्षा रक्षकांच्या ५ जागा आणि वाहनचालक पदाची १ जागा भरली जाणार आहे. अशा एकूण १६५ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

पदाचे नांव आवश्यक शैक्षणिक अर्हता
ज्यु. बँकिंग असिस्टंटशैक्षणिक पात्रता उमेदवार शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान ५० % गुण मिळवून उत्तीर्ण असावा. अथवा समकक्ष श्रेणी (equivalent) धारण करून उत्तीर्ण असावा. उमेदवारास संगणकीय ज्ञान असणे आवश्यक राहील. यासाठी उमेदवाराने शासन मान्य संस्थेतुन MSCIT हा संगणक कोर्स उत्तीर्ण केला असला पाहीजे.

अथवा महाराष्ट्र शासन निर्णय मातंस २०१२/प्र.क्र.२७७/३९ दि.०४ फेब्रुवारी, २०१३ नूसार माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामधील पदविका/पदवी/प्रमाणपत्र धारक.

शासन पुरकपत्र, सामान्य प्रशासन (माहिती तंत्रज्ञान) विभाग, क्र. मातंसं २०१२/प्र.क्र.२७७/ ३९, दिनांक ०८ जानेवारी, २०१८ नूसार पदवीधारक / प्रमाणपत्र धारक.

शासन पुरकपत्र, सामान्य प्रशासन (माहिती तंत्रज्ञान) विभाग, क्र. मातंसं २०१२/प्र.क्र.२७७/ ३९, दिनांक १६ जुलै, २०१८ नूसार प्रमाणपत्रधारक अथवा या परीपत्रकास अनुसरून शासनाकडील अद्यायावत पुरक परिपत्रक असल्यास ते गृहीत धरण्यात येईल
शिपाईउमेदवार ८ वी उत्तीर्ण ते १२ वी उत्तीर्ण पर्यंतचेच शिक्षण ग्राहय धरणेत येईल.
वाहन चालक उमेदवार ८ वी उत्तीर्ण ते १२ वी उत्तीर्ण पर्यंतचेच शिक्षण ग्राहय धरणेत येईल.
सुरक्षारक्षकउमेदवार ८ वी उत्तीर्ण ते १२ वी उत्तीर्ण पर्यंतचेच शिक्षण ग्राहय धरणेत येईल.

 अर्ज शुल्क –

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया २९ ऑगस्ट, २०२५ पर्यंत सुरू राहील. उमेदवारांना अर्ज शुल्क देखील ऑनलाइन पद्धतीने त्याच तारखेपर्यंत भरावे लागेल. कनिष्ठ लिपिक पदासाठी अर्ज शुल्क ८०० + १८% जीएसटी (एकूण ९४४) आहे. शिपाई, सुरक्षा रक्षक आणि वाहनचालक पदांसाठी शुल्क ५०० + १८% जीएसटी (एकूण ५९०) आहे. शुल्क भरल्याशिवाय अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

 परीक्षा पद्धत –

ठाणे डीसीसी बँक यासाठी परीक्षा पद्धती खालील प्रमाणे असेल .निवड प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. गणित, बँकिंग आणि सहकार, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, मराठी, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान आणि अभियोग्यता चाचणी या विषयांवर आधारित वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी प्रश्न असतील. परीक्षा मराठी आणि इंग्रजी भाषेतून घेतली जाईल. परीक्षेची तारीख बँकेच्या वेबसाइटवर लवकरच जाहीर केली जाईल.

 ठाणे डीसीसी बँक भरती मुलाखत

मुलाखत पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणा-या उमेदवारांची बैंक गठीत समितीकडून मुलाखत घेणेत येईल. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. सदर मुलाखत १० गुणांची असुन सदर गुणांचे भारांकन बैंक धोरणानुसार असेल त्यामध्ये १० पैकी ५गुण संबंधित उमेदवारांच्या खालील शैक्षणिक पात्रता/ अनुभव यानुसार देण्यात येतील व उर्वरीत ५ गुण मौखीक मुलाखतीस देणेत येतील.

ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाईल. समान गुण मिळाल्यास, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील रहिवासी, उच्च शिक्षण, अनुभव, वय (ज्येष्ठता) आणि आडनावांचे वर्णानुक्रम यांसारख्या घटकांना प्राधान्य दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाच्या प्रोबेशनरी पिरेडसाठी नियुक्त केले जाईल.
Thane DCC Bank Recruitment 2025 Application link: ठाणे डीसीसी बँक भरती अर्जाची लिंक: https://thanedccbank.com/
Thane DCC Bank Recruitment Notification PDF: ठाणे डीसीसी बँक नोटिफिकेशन पीडीएफ:

Leave a Comment