power grid corporation of india : पॉवरग्रीड नुकतीच हि जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिराती नुसार ‘Field Engineer and Supervior’ पदं साठी तब्बल 1543 जागांसाठी करण्यात येणार आहे. त्या साठी इच्छुक असलेल्याला पात्र उमेदवारांनी दिनांक 17/09/2025 पर्यंत अर्ज करावा.अधिक जाणून घ्या
पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये देशभरात एकूण १५४३ जागांसाठी भरती होणार आहे. फील्ड इंजिनिअर आणि सुपरवायझर पदांसाठी ही भरती आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर 2025 आहे. सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमधील लोकांसाठी ही चांगली संधी आहे.
जागा कशा आहेत?
- फील्ड सुपरवायझर (Civil): १९३ जागा
- फील्ड इंजिनिअर (Civil): १९८जागा
- फील्ड इंजिनिअर (Electrical): ५३२ जागा
- फील्ड सुपरवायझर (Electronics & Communication): ८५ जागा
- एकूण १५४३ जागांसाठी ही भरती आहे.
पात्रता काय आहे?
- फील्ड सुपरवायझर: संबंधित विषयात डिप्लोमा (५५% गुणांसह) आवश्यक आहे. एक वर्षाचा अनुभव महत्त्वाचा आहे. बी.टेक किंवा एम.टेक झालेले लोक अर्ज करू शकत नाहीत.
- फील्ड इंजिनिअर: बीई/बी.टेक./बी.एस्सी. (इंजिनिअरिंग) मध्ये ५५% गुण आवश्यक आहेत. एक वर्षाचा अनुभव पण पाहिजे.
- वयोमर्यादा: १७ सप्टेंबर २०२५ रोजी २९ वर्षांपर्यंत. आरक्षित वर्गांसाठी सवलत आहे.
पगार किती मिळेल?
- फील्ड सुपरवायझर: सुरुवातीला २३,००० रुपये बेसिक पगार आणि भत्त्यांसहित वर्षाला अंदाजे ६.८ लाखांचे पॅकेज मिळेल.
- फील्ड इंजिनिअर: सुरुवातीला ३०,००० रुपये बेसिक पगार आणि इतर भत्ते मिळून वर्षाला अंदाजे ८.९ लाखांचे पॅकेज मिळेल.
निवड प्रक्रिया कशी होणार?
यासाठी कॉमन FTE लेखी परीक्षा-२०२५ होणार आहे.
पेपर १ तासाचा असेल.
५० प्रश्न तांत्रिक विषयावर असतील.
२५ प्रश्न इंग्रजी, गणित, तर्कशास्त्र आणि सामान्य ज्ञानावर असतील.
प्रश्न वस्तुनिष्ठ (MCQ) प्रकारचे असतील आणि निगेटिव्ह मार्किंग नसेल.
सामान्य आणि ईडब्ल्यूएससाठी ४०% गुण, तर मागासवर्गीयांसाठी ३०% गुण आवश्यक आहेत.
फील्ड इंजिनिअरसाठी लेखी परीक्षेनंतर मुलाखत होईल. सुपरवायझरची निवड फक्त परीक्षेत मिळालेल्या गुणांवरून होईल.
अर्ज कसा करायचा?
अर्ज फक्त ऑनलाइन करायचा आहे. वेबसाईट http://www.powergrid.in आहे.
परीक्षा शुल्क: इंजिनिअरसाठी ४०० रुपये आणि सुपरवायझरसाठी ३०० रुपये तर SC/ST/PwBD/ExSM साठी फी नाही.
शेवटची तारीख: १७ सप्टेंबर २०२५